सेवा गोमातेची – श्रीक्षेत्र गाथा मंदिर देहू येथील गोशाळेस कडबा द्या – ह.भ.प. पोपट नाथा मिडगुले,ह.भ.प. सुदाम महाराज मिडगुले यांचे आवाहन

527

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – श्रीक्षेत्र गाथा मंदिर देहू या ठिकाणी प. पु. प्रातः स्मरणीय गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले यांनी त्या पवित्र पावन भुमीवर गोशाळेची उभारणी करून तेथे सुमारे शंभरावर गाईंची सेवा त्या ठिकाणी चालू आहे त्या गोमातेची सेवा आपल्याही प्रत्येकाच्या आयुष्या मध्ये घडावी या हेतूने हा शब्द प्रपंच करीत आहे कारण आपणा प्रत्येकाला शेवटचा प्रवास करतांना (वैतरणा ) नदी पार करावी लागणार आहे त्या ठिकाणी मृत्यू लोकात मिळविलेली एकही वस्तू उपयोगी पडत नाही तर त्या ठिकाणी आपल्या पदरी जर गोसेवेच्या पुण्याचा संचय आसेल तरच त्या ठिकाणचा प्रवास सुकर होतो असे वर्णन गरूड पुराणा मध्ये सांगितले  आहे आता उन्हाळा ही सुरु झाला असून गोमातांना ओल्या व सुका चाऱ्याची नितांत गरज भासणार आहे.ज्वारी पीक निघालेले असून त्या साठी आता आपणा प्रत्येका कडे गायांसाठी कडबा उपलब्ध आहे ज्यांना जेवढे शक्य होईल तेवढेच योगदान आपल्या कडून अपेक्षित आहे कोणाकडून गाईच्या सेवे साठी एक पेंढी एक पाचूंदा जेवढे शक्य होईल तेवढे श्री विठ्ठल रूक्मीणी मंदिराच्या पाठी मागे जमा करावे व कान्हूर मेसाई येथील परिसरातील भाविकांनी महालक्ष्मी पेट्रोल पंप शेजारी जमा  आदर्श गाव मिडगुलवाडीतील भाविकांना आवाहन करण्यात येत असल्याचेह. भ.प. पोपट नाथा मिडगुले सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे दळवी व ह.भ.प. सुदाम महाराज मिडगुले यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.
 “ऐका ऐका भाविक जन । भुत दया गाई पशुचे पालन |
 तान्हेल्या जिवन वनामाजी || कोण कोण व्हाल ते ।।”
अशाप्रकारे आवाहन करताच स्वतः ह.भ.प.सुदाम महाराज मिडगुले यांनी ६५० कडबा पेंढी, सतीश दाते कान्हूर मेसाई यांनी ५०० कडबा पेंढी, ह.भ.प. पोपट नाथा मिडगुले यांनी ४६९ कडबा पेंढी,धर्मेन्द्र मेहेता यानी गोमाताच्या चाऱ्या साठी ५०००/-रुपये चेक स्वरूपात जमा केला आहे.
देहू येथील या गोशाळेस ज्यांची अधिक मदत करण्याची इच्छा असेल त्यांनीतशी नोंद करून आपली मदत मिडगुलवाडी मंदिराच्या मागे आणून देणे किंवा जास्त असल्यास मिडगुले महाराज व दळवी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *