शिक्रापूर परिसरामध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त

116

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : तालुक्यातील शिक्रापूर या ठिकाणी शिक्रापूर परिसरामध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना वारंवार होत असताना व विशेष करून भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. तसेच परिसरातील कुत्र्यांमध्ये रेबीज सारख्या आजाराची लक्षणे दिसून आल्याने प्राणी मित्र डॉक्टर ज्योती कडे यांनी तात्काळ संबंधित ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या निदर्शनामध्ये आणून दिले व सर्व सदस्य, सरपंच व भाऊसाहेब शिवाजी शिंदे यांनी त्वरित निर्णय घेऊन मोकाट कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यावेळेस विशेष सहकारी म्हणून सात वर्ष मोकाट व मुक्या प्राण्यांसाठी विना मोबदला काम करणारे डॉ. विनोद साळवे सर यांनी मोलाची सहकार्य केले. तसेच सरपंच रमेश गडदे, सुभाष मामा खैरे, सारिका ताई सासवडे, ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळेस  सरपंच रमेश गडदे म्हणाले की मोकाट आणि फिरणाऱ्या कुत्र्यांना नसबंदी व रेबीज लस देऊन त्यांच्यापासून नागरिकांना होणारा त्रास निश्चित थांबणार आहे व भविष्यामध्ये मोकाट कुत्र्यांसाठी व मुक्या जनावरांसाठी लागणारी मदत ग्रामपंचायत माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू व त्यांनी सर्व सहकारी मित्रांचे आभार व्यक्त केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *