माजी खासदार आढळराव पाटील यांच्याकडून कवठे येथे विद्युत ट्रान्सफार्मर साठी सी.सी.टी.व्ही भेट

1096
         शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिवसेनेच्या संवाद यात्रे दरम्यान शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे अक्षय आढळराव पाटील यांच्यासमोर सातत्याने विद्युत ट्रान्सफार्मर चोरी जात असल्याची कैफियत मांडताच शेतकऱयांनी सी.सी.टी.व्ही उपलब्ध करून देण्याची मागणी केले होती. त्या मागणीची पूर्तता अक्षय आढळराव पाटील यांच्याकडून आज दि.१४ ला करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी कवठे येथे शिवसेनेचा संवाद दौरा संपन्न झाला होता. हा दौरा माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचे चिरंजीव शिवसेना नेते अक्षय आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला होता.
        यावेळी कवठे येमाई गावातील काही शेतकऱ्यांनी अक्षय आढळराव पाटील यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा मिळण्याबाबत मागणी केली होती. ही मागणी करतानाच विजे अभावी शेतकऱ्यांना होणारा त्रास, ट्रांसफार्मरची चोरी यामधून शेतकरी किती त्रासून गेले आहेत या बाबतच्या व्यथा शेतकऱ्यांनी बैठकीतच सांगितल्या होत्या. त्यानंतर अक्षय अढळराव पाटील यांनी  सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिवशी तुमच्या पर्यंत पोहोचेल अशी ग्वाही दिली होती आणि या पुढील काळात देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही  खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन देखील दिले होते. आज दिनांक १४ ला  युवा सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख व त्यांचे सर्व सहकारी सीसीटीव्ही कॅमेरा घेऊन कवठे गावात शेतकऱ्यांना देण्यासाठी घेऊन आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.
         यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, शिरूर तालुका प्रमुख शिवसेना मल्हारी काळे, युवा सेना तालुकाप्रमुख विष्णू वाळके, उपतालुकाप्रमुख अमोल पोकळे, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,ग्रा पं सदस्य पांडुरंग भोर,ग्रा पं सदस्य बाळशिराम मुंजाळ , सा कार्यकर्ते पोपट रोहिले , एकनाथ इचके,परशुराम पोळ,शेतकरी धर्मेद्र चौधरी उपस्थीत होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *