छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चा यावर्षीचा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार ह.भ.प. नाना महाराज कापडणीस यांना जाहीर 

387
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार निरपेक्ष कीर्तन सेवा समूहाचे राष्ट्रीय मुख्य प्रवर्तक तथा मुख्य संकल्पक ह.भ.प. नाना महाराज कापडणीस यांना जाहीर झाला असून नाशिक येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळा २०२४ मध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ७८ मान्यवरांना राज्यस्तरीय शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
         ह.भ.प. नाना महाराज कापडणीस निरपेक्षपाने कीर्तन,प्रवचन सेवा करताना समाजजागृतीचे कार्य अखंडित पणे करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चा यावर्षीचा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार ह.भ.प. नाना महाराज कापडणीस यांना जाहीर झाला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी (संचालक – साईबाबा हॉस्पिटल)विलास पाटील,(मुख्य संपादक – सक्षम पोलीस टाईम),विलास सूर्यवंशी (संपादक – नाशिक स्टार न्यूज),मिलिंद सदगुरे ( संपादक – दैनिक पुढारी) अजय भोसले( संपादक – लक्ष महाराष्ट्र),ऍड. प्रकाश जगताप  (अध्यक्ष कल्याण वकील संघ) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा  उद्योजक शरद अण्णा पवार यांच्या प्रयत्नांनी या पुरस्कार सोहळ्याचे संयोजन करण्यात आले असून संघटनेचे महाराष्ट्र चे महासचिव व कायदेशीर सल्लागार ऍड. अलका मोरे पाटील,महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ऍड. विनया ताई नागरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मीताई परदेशी, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष ऍड, मनीषा शेलोटकर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ऍड गौरव तिडके व ह.भ.प. लक्ष्मण महाराज, पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *