अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विज सवलत,दुध दरवाढ,शेतमाल नुकसान भरपाई द्या – योगेश ओव्हाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

600

          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील दोन वर्षांपासून सूरु असलेल्या कोरोणा महामारीमुळे राज्यातील शेतकरी शेतमालाला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे मेटाकुटीस,अडचणीत आल्याने,शेतकरी बांधवांना विज सवलत,दुध दरवाढ,शेतमालास राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवशंभू जिजाऊ सेनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेल द्वारे निवेदन देत केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात ओव्हाळ यांनी म्हटले आहे कि, राज्यातील शेतकरी कोरोणा,अतिवृष्टी,पूर,अवकाळी पाऊस,नापिकी,शेतमालास मिळणारे अत्यल्प,कमी बाजारभाव यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडून कोलमडला आहे. मेटाकुटीस आलेल्या शेतकऱयांना फक्त सरकारच ऊभे करु शकते. सध्या राज्यातील कृषीपंप वीज तोडणी सुरु आहे. दुध उत्पादक शेतकरी कमी दुध दर मिळत असल्याने त्याचा उत्पादन खर्च निघत नाही. कष्टाने शेतात वेगवेगळे शेतमाल पिकवत असताना कुठल्याच  मालाला भाव नसल्याने शेतकर्‍याला आपला शेतमाल शेतात,रस्त्यावर,मार्केट मध्ये फेकून द्यावा लागत आहे.
या कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने शेतीमालास शाश्वत हमी भाव द्यावा, कृषीपंप विजतोडणी रद्द करावी,गाईच्या दुधाला किमान ३५ रुपये लिटर हमीभाव द्यावा,कोरोणा काळात शेतमाल नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना विशेष पॅकेज देऊन मदत करावी अशी मागणीही ओव्हाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *