तांदळीत कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती उत्साहात संपन्न – माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस इन्व्हर्टर संच भेट 

447
        शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती आज दि. २४ ला शिरूर तालुक्यातील तांदळीच्या कै.केशव पांडुरंग गदादे विद्यालयात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेस २२ हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर संच भेट दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
         आज बुधवार दि. २२ सप्टेंबर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती. शिरूरच्या पूर्व भागातील तांदळीच्या रयत शिक्षण संस्थेचे कै.केशव पांडुरंग गदादे विद्यालय तांदळी येथे करोनाचे सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी सात ते आठच्या दरम्यान सर्व परिसराची स्वच्छता ससाने मामा,शेलार मामा यांनी केली. गावडे मॅडम व नाईक मॅडम यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळी यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
 तांदळी गावच्या सरपंच स्मिता सुरेश गदादे, इतर सदस्य तसेच प्रा. सुभाषराव कळसकर, शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे, स्थानिक स्कूल कमिटी चे उपाध्यक्ष दत्ता अण्णा गदादे, व इतर सदस्य,लक्ष्मण नाना कळसकर,गोरख काका खोरे, चेअरमन श्री.दत्त तांदळी सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य शंकर भाऊ गदादे, संजय लक्ष्‍मण कळसकर,सुरेश रोहिदास गदादे, मधुकर बबन गदादे या मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या  प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गदादे सर यांनी केले.पंचायत समिती सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे,प्रा.सुभाषराव दिनकर कळसकर  यांनी एसएससी बॅच २०२०-२१ च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. गेल्या वर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या अडचणी जाणून घेऊन आपले उत्तरदायित्व म्हणून शाळेसाठी नामांकित कंपनीचा इन्व्हर्टर भेट दिला. त्याचा स्वीकार श्री.दत्ता अण्णा गदादे व स्थानिक स्कूल कमिटीचे इतर सदस्यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सोनवणे यांनी मानले. उपस्थित सर्व मान्यवर व माजी विद्यार्थी यांना खळदकर,बोरसे यांच्या नियोजनातून अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *