शिरूरच्या तहसीलदारपदी रंजना ढोकले,उंबरहांडे या सक्षम महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती

412
          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी रंजना ढोकले,उंबरहांडे यांनी शिरूर तहसीलदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. तर नायब तहसीलदार म्हणून ४ महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या स्नेहा गिरीगोसावी या दोन सक्षम महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. ग्रामीण भागातून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्न घेऊन भेटीस येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आस्तेने चौकशी करून ते तात्काळ कसे सोडविले जातील यांस प्राधान्य देणाऱ्या या दोन सक्षम महिला अधिकाऱ्यांची शिरूरला नियुक्ती झाल्याने तालुक्यातील विशेषतःग्रामीण भागातून तहसील कार्यालयाशी संबंधित कामे असलेल्या शेतकरी,नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
            रंजना ढोकले,उंबरहांडे यांची शिरूरच्या तहसीलदारपदी तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्ती असल्याची माहिती मिळाली असून सर्व सामान्यांचे प्रश्न समजावून घेत ते त्वरेने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तहसिलदार उंबऱहाडे व नायब तहसीलदार गिरीगोसावी यांच्या सारखे अधिकारी शिरूर तहसील कार्यालयास मिळाल्याने ग्रामीण भागातील या विभागाशी संबंधित रेंगाळत राहिलेली कामे जलदगतीने मार्गी लागतील असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.
             तहसीलदार उंबरहांडे यांना तालुक्यातील अनेक गावातील काही ८ व ७/१२ उतारे संगणकीय मिळत नाहीत याबाबत विचारले असता ज्या ज्या गावातील असे उतारे संगणकीय होण्याचे काही काम बाकी असेल,त्यात काही त्रुटी असतील तर ते काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.तर नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी म्हणाल्या की, तालुक्यामधील सामान्य जनतेला नवीन शिधापत्रिका,जीर्ण झालेल्या शिधापत्रिका बदलून देण्यात येतील त्या करीता नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर केल्यास त्याची पडताळणी करून त्यांना तात्काळ नवीन शिधापत्रिका तात्काळ देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. त्यामुळे आगामी काळात तहसीलदार कार्यालयात शेती विषयक कामे घेऊन जाणाऱ्या नागरिकांची कामे आता या दोन सक्षम व समजदार महिला अधिकाऱ्यांची शिरूरला नियुक्ती झाल्याने त्वरेने मार्गी लागतील व वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *