शिरपूर जैन,वाशिम : शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचे मा.प.स.सदस्य अलीम खा उस्मान खा यांचे मालेगाव तहसीलदारांना निवेदन

576
        शिरपूर जैन,वाशिम : शिरपूर जैन येथील माजी पं.स. सदस्य अलीम खा उस्मान खा पठाण यांनी दिनांक १० सप्टेबर २०१८ रोजी तहसीलदार मालेगाव यांना अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात होत असल्याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यानुसार शिरपूर येथील रिसोड बायपास ते बस स्थानक रोडवर अपंगाच्या प्लॉटला लागून लगतच्या शेतात जे प्लॉट आहे ते संपूर्ण सरकारी ई क्लास आहे. तेथे ही अतिक्रमण करण्यात आले असून  झेरॉक्स चे दुकान व दुध डेअरी व त्या रोडच्या समोरील बँक सुद्धा सुध्दा सरकारी जागेत आहेत. हे सर्व अतिक्रमण पाडण्यात यावे. त्याच प्रमाणे निवेदनात असे सुद्धा नमूद आहे कि बस स्थानक ते पवळी मंदिर रस्त्यावर सुद्धा ३ ते ४ पक्की बांधकामे आहेत, जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेच्या भोवताली  सुद्धा अतिक्रमण झालेले असून ते सुद्धा काढण्यात यावे असे ही अलीम खा उस्मान खा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. .
         यावर तहसीलदार यांनी  ग्राम सचिव शिरपूर यांना आदेशीत करून अपंगांना दिलेल्या प्लॉटच्या मागे सरकारी जागेत जे अवैध बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे.ते अवैध बांधकाम हटवून अतिक्रमण काढणे बाबत नमूद केले आहे.
– राजेश वझिरे : तहसीलदार मालेगाव 
याविषयी अलीम खा उस्मान खा पठाण शिरपूर यांचे निवेदन प्राप्त झाले असून संबंधित विभागाला याबाबत नियमानुसार कारवाई करून तहसील कार्यालयाला अहवाल पाठविण्यात यावा असे आदेशित करण्यात आले आहे. 
– प्रतिनिधी,गोपाळ वाढे,(सा.समाजशील,शिरपूर जैन,वाशीम



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *