मुरबाड,ठाणे : मूरबाड मधिल म्हाल्हेड गावात गणपतीचे बँनर फाडल्याने दोन गटात हाणामारी, दोन्ही गटावर गुन्हा दाखल

673
        मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हाल्हेड गावात एेन गणपती सणात गणपती सणाच्या शुभेच्छा देणारे बँनर फाडल्याने काल दि. १४ सप्टेबंर रात्री  दोन गटात हाणामारी झाल्याने परस्परा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संतोष भगवान पवार यांच्या गटाने  गणपती सणाचे शुभेच्छा देणारे बँनर  गावात लावले असताना ते  बँनर फाटल्याचे आढळल्याने गावातील रुपेश किसन ठाकरे यांच्या गटाला  विचारणा झाल्यावर या दोन्ही गटात हाणामारी झाली.  या प्रकाराबाबत संतोष भगवान पवार यानी  मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार. दिली.   यात कल्पेश पवार, मदन ठाकरे,गिरिष ठाकरे, संदिप पवार व काशीनाथ दळवी यांच्या विरोधात तक्रार दिली तर रुपेश किसन यानी या विरोधी तक्रार करत संतोष पवार,विजय पवार,भरत पवार, सचिन पवार, हेमंत पवार व लक्ष्मण पवार यांच्या विरोधात तक्रार दिली. या बाबत मुरबाड पोलिस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हा दाखल असल्याचे ठाणे आमलदार निचिते यांनी सांगितले तर तपास पी एस आय चिमाडा याना सोपवण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले
          मात्र हा वाद राजकिय असल्याची चर्चा असुन माजी आमदार गोटीराम पवार व विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या गावात हा वाद घडल्याने राजकिय चर्चेला उधान आले आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *