शिरपूर जैन,वाशिम : शिरपूर बस स्थानकात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काडून रहदारी सुरळीत करा – पं.स.सदस्य शिल्पा देशमुख यांचे आवाहन

500
            शिरपूर जैन,वाशिम : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील  तीर्थक्षेत्र शिरपूर जैन येथील  बस स्थानक परिसरात होत असलेली  वाहतूक कोंडी व त्यामुळे रहदारीस येत असलेला अडथळा यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा  याकरिता पंचायत समिती सदस्या शिल्पा पंकज देशमुख यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना दिनांक १३ सप्टेबर रोजी निवेदन दिले आहे.
 शिरपूर बस स्थानक परिसरात नेहमीच वाहनाची वर्दळ असते त्यामुळे एस.टी.बसेस वळवितांना किरकोळ अपघात होऊन नेहमीच स्थानिक वाहन धारकांसोबत वादविवाद होत असतात.
   त्यामुळे परिवहन महा मंडळाच्या बसेस शिरपूर येथील स्थानकावर येत नाहीत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना पायपीट करावी लागते. या प्रश्नासंदर्भात रिसोड आगार व्यवस्थापकांनी शिरपूर पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्याशी मे २०१८ मध्ये पत्रव्यवहार केला होता परंतु अजूनही या बाबीवर तोडगा निघालेला नाही. शिरपूर बस स्थानक परिसरात अनेक खासगी वाहने उभी असतात. तसेच स्थानिक ऑटो धारक बांधवांना सुद्धा दुसरी जागा नसल्यामुळे त्यांना नाइलाजास्तव आपली वाहने बस स्थानक परिसरात उभी करावी लागतात. त्यामुळे पर्यायी अशी पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील जागा ऑटो धारकांना देऊन या बाबीवर तोडगा निघू शकतो. यामुळे  वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच परिसरातून जाणा-या सर्व बसेस बस स्थानक परिसरात येऊ शकतील. या व्यतिरिक्त आपणाकडे काही पर्यायी व्यवस्था असल्यास बस स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले असून आता पोलीस प्रशासन व संबंधित विभाग यावर काय कार्यवाही  करतात  याकडे नागिराकांचे लक्ष  लागले आहे.
– प्रतिनिधी,गोपाळ वाढे,(सा.समाजशील,शिरपूर जैन,वाशीम



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *