शिरूर तालुक्यात कोरोनो ओमिक्रॉनचे कोणतेही रुग्ण नाही – डॉ. मोरे

249
शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) : शिरुरमधे कोरोनो ओमिक्रॉनचे सात रुग्ण आढळल्यांची बातमी एका टिव्ही चॅनलला सुरु असल्यांने शिरूर मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘समाजशील’ ने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दामोदर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर मोरे यांनी सांगितले की, ” या भागात परदेशातून सात प्रवासी आले होते. परंतु या सर्वांची तपासणी केली असता हे सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. परंतु नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.” शिरूर तालुक्यात कोरोनो ओमिक्रॉनचे कोणतेही रुग्ण आढळले नसल्याने जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *