शिरूर तालुका मनसेचा महावितरणला कंदील भेट

228
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : कोरोना महामारीत लॉकडाऊन होता त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असुन
महावितरणाने शेतकरी व सर्व सामान्य ग्राहकांवरील जुलमी महावसुली सावकारकी बंद करावी अन्यथा मनसेच्यावतीने निषेध म्हणून केदील भेट देण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणचे कार्यकारी उपअभियंता सोमनाथ माने यांना ६ दिवसापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ६ दिवस उलटून गेल्यानंतर महावितरणने शेतकरी व नागरीकांकडुन वीजबीलासाठी केलेली सक्ती ही एक प्रकारची सावकारकी असल्याचा आरोप करत शिरुर -हवेली मनसेने आज निषेधार्थ महावितरणच्या  कार्यकारी उपअभियंता सोमनाथ माने यांना कंदील भेंट देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी मनसे, शिरूर हवेली तालुका अध्यक्ष तेजस यादव,  जनहितकक्ष जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे, रयत शेतकरी संघटनेचे भरत काळे, अविनाश घोगरे,अविनाश घोगरे, संदीप कडेकर, रमणलालजी भंडारी, विकास साबळे, हुडको वासिय कृती समितीचे संघटनेचे शैलेश जाधव, शारदाताई भुजबळ, नितीन वायकर व कार्यकर्ते उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *