कवठे येमाईत ग्रामपंचायतीकडून कर वसुलीस गती – मार्च अखेर १०० टक्के वसुली करण्याचा प्रयत्न करणार – संतोष गायकवाड 

251
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे ग्रामपंचायतीस नागरिकांकडून देय असलेली सन २०२१/२२ साठीची करवसुली मोहीम गतिमानतेने सुरु करण्यात आली असून ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायतीस देय असलेली घरपट्टी,पाणीपट्टी व इतर कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड,सरपंच मंगलताई सांडभोर,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.मार्च २०२२ अखेर १०० टक्के करा वसुली करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गायकावड यांनी सांगितले.
          नवीन वर्ष २०२२ आज सुरु झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून कर वसुली मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी बबनराव शिंदे,प्रतिमा काळे,विकास उघडे,अमोल पंचरास,वसंत सावंत,हौशीराम शिंदे,गणेश दळवी यांनी ग्रामपंचायतीतील आपापली कामे सांभाळून ग्रामपंचायतीस जास्तीत जास्त करवसुली होण्याकामी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी दिलेल्या करातूनच आरोग्य,दिवाबत्ती,स्वच्छता,पाणीपुरवठा,कर्मचारी व इतर विकासात्मक कामांवर खर्च होत असल्याने व नागरिकांनी ग्रामपंचायतीस दिलेल्या करातूनच अनेक स्थानिक कामे होत असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीस देय असलेले सन २०२१/२२ साठीचे कर तात्काळ भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी गायकवाड व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *