निमगाव भोगी येथे सेवानिवृत्त मेजर शंकर राऊत यांचे जंगी स्वागत

275

शिरूर, पुणे, (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील निमगावभोगी येथे निवृत्त होऊन गावात आलेल्या मेजर शंकर उर्फ संतोष राऊत या जवानाचे जंगी स्वागत करण्यात आले.  गावाच्या या सुपुत्राचे ग्रामस्थ व त्रिदल आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गावापासून दूर राहून लष्करात २००३ ते २०२२ असे १९ वर्षे सेवा केलेल्या मेजर संतोष साहेबराव राऊत यांची तिरंगा देऊन जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने राऊत हेही भारावून गेले. यावेळी दत्तात्रय जगताप यांनी त्यांच्यावर कविता करत त्यांचे कौतुक केले तर लहान मुलींनी कविता सादर केली. ‘मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्‍वासापर्यंत सुरूच राहील,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी यांनी व्यक्त केली. यावेळी शिरूर-आंबेगाव विधानसभा रा. काँ. अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, त्रिदल आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, सरपंच उत्तम व्यवहारे, राजाराम सांभारे, संदीप सांगळे, पुणे जिल्हा महिला सुरक्षा अध्यक्षा अस्मिता पाचंगे, वर्षाताई काळे, राणीताई खामकर, रहीताई खामकर, ऍड. रेश्मा चौधरी, अश्विनी थोरात, उज्वलाताई इचके, श्यामराव धुमाळ, बबन पवार, ऍड.महेश रासकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *