राऊतवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

312

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : स्व. मनोज अरूण राऊत यांच्या चतूर्थ स्मृतीदिनानिमित्त ‘आप्पा फांऊडेशन च्या वतीने, रविवार   राऊतवाडी (शिक्रापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संपन्न झाले. शिबिरात सर्व आजारांवर मोफत तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले. याचबरोबर सांधेदुखी, मणके विकार आणि हाडांच्या आजारा संदर्भातील तपासणी, महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी व रक्त वाढीच्या औषधांचे वाटप झाले. तसेच डोळ्यांची सर्वसधारण व मोतीबिंदू तपासणी झाली. आरोग्य शिबिरात राऊतवाडीसह वाबळेवाडी, शिक्रापूर व परिसरातील 367 हुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यापैकी 45 जणांना नाममात्र दारात चष्मावाटप आणि 68 जणांना मोफत x-ray रिपोर्ट करून दिले. मोतीबिंदू तपासणीमध्ये आढळून आलेल्या 16 मोतीबिंदू रूग्णांपैकी 12 रूग्णांवर दुसऱ्या दिवशी फाऊंडेशनच्या माध्यमातून बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया येणार आहे. या शिबिरात डॉ ख़राडे अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल (अहमदनगर), स्व. तात्या बापट स्मृती समिती, चिंचवड पुणे, यांच्यासह शिक्रापूर, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नामवंत हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर सहभाग घेतला होता. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून, भविष्यात उद्भविणा-या आजारांवर वेळीच मात करावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील एका होतकरू तरूणाचे अकाली निधन झाल्याने, ‘गावाने गावासाठी आरोग्यसंपन्न गाव’ हा संकल्प करून या शिबिराचे आयोजन केले होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *