दोंडाईचातील आरिफखान व गुलामरसुल या दोघे भावंडाचा मोटारसायकलवर देश फिरण्याचा संकल्प !

228

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : शहरातील  बांधकाम क्षेत्रात अभियंता म्हणून प्रसिद्ध असलेले उच्च शिक्षित तरुण अरीफखान पठाण व गुलामरसुल शेख हे सिव्हिल इंजिनियरचे शिक्षण घेऊन बांधकाम क्षेत्रात अभियंता असून मोटारसायकलीने प्रवासाचा छंद जोपासतात. देश मोटारसायकलीने फिरण्याचा मानस त्यांनी आखला आहे. तर आता पर्यंत त्यांनी लाखो किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर सध्या देखील जम्मू काश्मीरसह विविध ठिकाणी फिरून दोंडाईचा येथे परतले आहेत. अनेक पर्यटन स्थळासह विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्यांनी साडेसहा हजार किमी प्रवास करत आपला छंद जोपासला आहे. दोन्ही भाऊ इंजिनियर आहेत. छंद एकच असल्याने आरिफखान व भाऊ गुलामरसुल शेख हे दोन्ही भाऊ बांधकाम अभियंता असून आरिफखान पठाण व गुलामरसुल खान मोटारसायकलीने जम्मू काश्मीर सह 9 राज्यात साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करत सुखरूप आपल्या मुळगावी दोंडाईचा येथे परतले असून, त्यांचे सर्वच स्थरातुन कौतुक केले जात आहे. दोंडाईचा ते जम्मू काश्मीर पर्यंत जात आपल्या कार्याचा ठसा उमटवित त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, असा एकूण 9 राज्यात प्रवास करून दोंडाईचा येथे आगमन केले. खासकरून त्यांनी भारतातील शेवटचे गाव व पाकिस्तान सीमेवरील तूर्तुफ गावी भेट दिली. त्यांनी प्रत्येक राज्यातील संस्कृती चालीरीती राहणीमान  त्याठिकाणी असलेले धार्मिक स्थळांची पाहणी करत त्यांचा इतिहास जाणून घेतला. प्रवासात काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेशांत राईड करतांना अनेक अडचणींचा सामना पठाण बंधूना करावा लागला. लदाख मधील सर्वात उंच ग्रास थंड हवामान होते, सर्वात उंच रस्ता खारडुंगला ह्या 17 हजार उंचीच्या शिखरावर द्रास याठिकाणी भेटी दिल्या.तसेच त्यांनी 18 हजार फूट उंच मारस्कमिकला तसेच 19 हजार फूट उंच व जगातील दुसरे थंड हवेचे ठिकाण द्रास याठिकाणीही भेट दिली. त्याठिकाणी अक्सिजन प्रमाण कमी असल्याने रस्त्यावर प्रवास करताना, शिखरावर मोटरसायकल प्रवास करतांना अनेक संकटाना सामना करावा लागला. ते दरवर्षी जवळपास सहा हजाराचा किलोमीटरचा प्रवास करतात.गेल्या आठ वर्षापासून वर्षभरातून एकदा लांब पल्ल्याचा प्रवास मोटारसायकलीने करत असतात. ते दोंडाईचा येथे परतल्यावर त्यांच्या मित्र परिवारासह राजकीय  समाजिक पदाधिकारी व  कार्यकर्ते सह त्यांचे अभिनंदन करत कौतुक होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *