मुरबाड मध्येही सेनेचे दोन गट ; सामान्य शिवसैनिकांची परीक्षा

653
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) :राज्यात शिवसेना पक्षात निष्ठावंत शिवसैनिक व शिंदे गट शिवसैनिक अशी गटबाजीचे ग्रहण लागले असताना या गटबाजीचे ग्रहण मुरबाड विधानसभेत ही लागले असून, ठाणे जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी मुरबाड नगरपंचायतच्या नगरसेवकांसह शिंदे गटात सामील झाले. तर सुभाष पवार यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत आलेला संपुर्ण गट शिंदे गटात सामील झाल्याने मूळचे जूने शिवसैनिक आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असून आम्ही मातोश्रीचे शिवसैनिक असल्याचे सांगत सत्तेसाठी आलेली सत्तेंसाठी गेले अशी टीका करत गद्दार व निष्ठावंत अशी विभागणी दिसून येत आहे. नुकताच आम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दिल होता. तर जे सत्तेसाठी आले होतें ते सत्तेसाठी पुन्हा गेले, ज्यांच्या विरोधात गेली अडीच वर्ष मुरबाड विधानसभा क्षेत्रात लढले त्यांचाच झेंडा उचलण्याची पाळी आली असल्याने आम्ही मूळ शिवसैनिक आहोत व मातोश्रीच्या आदेशाचे पालन करू असे मत मांडत आहेत. त्यामूळे या गटबाजीमुळे सत्तेपासुन दुर असलेला शिवसैनिकाची परीक्षा सूरू असून कोणता झेंडा घेऊ हाती अशी परीस्थिती पहायला मिळत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *