लोकनेते स्व.महादेवराव बोडके यांच्या ११ पुण्यतिथी निमित्त पिंपरी बुद्रुक येथे  ह.भ.प मामा काजळेे यांची कीर्तन सेवा संपन्न  

818
निरा नरसिंहपुर,इंदापूर : (प्रतिनिधी बाळासाहेब सुतार) – पिंपरी बुद्रुक येथे लोकनेते स्व. महादेवराव बोडके यांच्या ११ पुण्यतिथी निमित्त ह-भ-प मामा काजळेे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.  मनुष्याने घेतलेला जन्म हा परमार्थ विना वाया घालू नये,हाताने टाळी वाजवणे, विठ्ठलाचे नाम घेणे आणि कानाने चांगले विचार ऐंकणे गरजेचे असून वडीलधार्‍या माणसांचा मान राखणे, पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी नेमाने करावी असे आवाहन ह भ प काजळे महाराज यांनी कीर्तन सेवेतून केले. पिंपरी येथील समाधान महादेवराव बोडके यांच्या निवासस्थानी कीर्तन सेवा संपन्न झाली. कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व वारकरी व भजनी मंडळ ग्रामस्थ यांनी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *