मुरबाड एम आय डी सी परिसरातील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला केलें जेरबंद ; पोलिसांच्या रिंग राऊंड गस्ती ला पुन्हा यश

530

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड एम आय डी सी परिसरात रात्री उभ्या असलेल्या ट्रक मधुन डिझेल चोरी होत असल्याची तक्रारी मुरबाड पोलीसांना प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी रात्र कर्तव्यावर रिंगराउंड गस्तीवर नेमलेल्या गस्ती पथकास याबाबत सतर्क करत त्या परिसरात गस्त करताना अशा संवशयीतांना तपासणे बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने रिंग राउंड गस्तीवर असलेले पो.ह. चतुरे, पो.ना.मांदळे, पोलीस शिपायी चालक शरद शिरसाठ हे पहाटे 3 च्या सुमारास मुरबाड एम आय डी सी परिसरात रिंगराउंड गस्त करत असताना एका कार मधील इसम संशयित रित्या रस्त्याच्या कडेला कार पार्क केलेल्या ट्रक जवळ ड्रम् घेवून डिझेल टाकीजवळ डिझेल कlढत असल्याचे दिसले. पोलीस गाडी आल्याचे पाहून ते इर्टिका कार घेऊन पळू काढत कार गाडी गल्लीत पार्क करून अंधारात पळून  गेले असता पोलीसांनी सदर गाडी ताब्यात घेवून पाहणी केली असता त्या मध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रम मध्ये डिझेल मिळून आले. सदर डिझेलचे डबे 240 लिटर् डिझेल सह, कार गाडी ताब्यात घेवून चोरीचा गुन्हा दाखल केला.
मुरबाड पो.ठाणे चे तपास पथक ए एस आय. नीचीते, पोलिस नायक. देवरे, काँ. सचिन थोरात यांनी  जलद तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. यामुळे एम आय डी सी मुरबाड परिसरात डिझेल चोरी करणारे गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस या टोळीतील अधिक आरोपींचा शोध पोलिस घेत असून मुरबाड मनिफॅक्चर अशोशियन मुरबाड पोलिसांना सन्मानित करणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *