मलठणला युवा क्रांती, मित्र,माहिती अधिकार संघटनेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन – पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांची उपस्थिती 

317
मलठण,शिरूर : (कल्पना पाचर्णे,पुंडे,सा.समाजशील वृत्तसेवा) -युवा क्रांती संघटने अंतर्गत पोलीस मित्र,माहिती अधिकार,पत्रकार, ग्राहक संरक्षण, संघटने च्या पुणे विभागीय मलठण कार्यालयाचे उद्घाटन शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघमारे,पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेश गायकवाड,शिवाजीराव शेलार,पुणे जिल्हा  प्रसिद्धी प्रमुख पत्रकार,प्रा.सुभाष शेटे,पदाधिकारी,सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
     संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, जयश्रीताई अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेश आप्पा गायकवाड आणि त्यांचे सर्व पोलीस मित्र संघ यांच्या संकल्पनेतून युवा क्रांती संघटनेचे कार्यालय मलठण गावामध्ये सुरू करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने टाकळी हाजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील उगले श्री गणेश मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
       पोलीस मित्र संघटनेला ज्या ज्या वेळी पोलिसांची मदत लागेल त्या त्या योग्य वेळी पोलिसांची मदत देण्याचे आश्वासन उगले यांनी दिले.
           तर उपस्थितांना संघटनेची ध्येय धोरणे,कार्यप्रणाली याबाबत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघमारे यांनी सविस्तर मार्गदशन केले.
        मागील २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार व संघटनेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुभाष अण्णा शेटे यांच्याकडे असणारे संघटन कौशल्य व मार्गदर्शन ऐकून उपस्थित अनेकांनी शेटे यांचे स्वागत केले. संघटना वाढीसाठी व बळकटी साठी त्यांचे विचार व संघटन कौशल्य नक्कीच प्रेरणादायी असल्याचे सांगत पश्चिम विभागीय अध्यक्ष किरण वाघमारे ,सुरेश गायकवाड,शिवाजीराव शेलार,अशोक गायकवाड यांनी अभिनंदन केले.
       तर संघटन वाढीसाठी मनापासून कार्य करणार – प्रा.सुभाष शेटे 
  “युवा क्रांती,ग्राहक,माहिती अधिकार,पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय  संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी सर्व सामान्य ग्राहक,समाजभिमुख कार्य करणारे पत्रकार, नागरिकांना येणाऱ्या अडचणी,व त्या कशा पद्धतीने सोडविल्या जाव्यात  त्यासाठी कौशल्य कसे असावे,संघटन वाढ कशी करता येऊ शकते या विषयी मार्गदर्शन व संघटनेच्या ध्येय धोरणांची संकल्पना व माहिती राज्यातील संघटनेच्या गाव,तालुका ते जिल्हा,राज्य पातळीवर पोहचावी म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी कुठलीही जबाबदारी दिली तर राज्यात संघटन वाढीसाठी मनापासून कार्य करणार असल्याचे पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी सांगितले.” 
   मलठण ता.शिरूर,जि.पुणे येथील पुणे जिल्हा विभागीय कार्यालय उदघाटन प्रसंगी,पुणे विभागीय महिला पदाधिकारी डोके,नवले,बांगर,रोकडे विभागीय अध्यक्ष सुरेश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष शिवाजी शेलार, पत्रकार सुभाष शेटे,कल्पना पुंडे,सुदाम रणदिवे, छाया नवले,जयश्री रणदिवे व संदीप भाकरे तसेच पोलीस मित्र संघटना पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *