शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका हा लोकसंख्येने मोठा तालुका म्हणून गणला जातो. तालुक्यातील महिलांच्या अनेक समस्या असतात,त्या सोडविण्यासाठी समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात विशेष करून सर्वसामान्य महिलांना योग्य ती मदत करण्याची सातत्याने प्रयत्नशील असलेल्या रामलिंग महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी (राणी) कर्डिले यांची नुकतीच यशवंतराव चव्हाण सेंटर शिरूर तालुका समुपदेशक पदी निवड करण्यात आली.कर्डिले यांना या निवडीबाबतचे पत्र शिरूर हवेलीचे आमदार.अशोक बापू पवार
यांच्या हस्ते देण्यात आले.
राणी कर्डिले यांच्या सारख्या सक्षम महिलेची तालुका समुपदेशक म्हणून निवड झाल्याने तालुक्यातील महिलांच्या कौटुंबिक अडचणी मोफत सोडविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मार्गदर्शन होणार असून महिलांना मोठा आधार मिळणार आहे.त्यामुळे कोणत्याही महिलांवर अत्याचार,अन्याय होत असेल तर त्यांनी सौ राणी कर्डिले यांच्या ८३२९०४४१७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कर्डिले यांनी केले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाममामा वरपे,शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विश्वास काका ढमढरे,शहराध्यक्ष.मुजफ्फर कुरेशी, पंडित आप्पा दरेकर मा.सदस्य पुणे, जिल्हा नियोजन समिती,विद्याताई भुजबळ अध्यक्ष.शिरूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस,तुषार दसगुडे अध्यक्ष.शिरूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष केशव शिंदे, प्रशांत पवार सर अध्यक्ष शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया,राणी शिंदे,दिपाली आंबरे, छाया हारद ,डॉ.स्मिता कवाद,संगिता शेवाळे,हाफिज बागवान कार्याध्यक्ष, राजुद्दीन सय्यद अध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग, राहील शेख उपाध्यक्ष पुणे जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी, सागर नरवडे, अमित शिर्के पत्रकार.नितीन बारवकर, पत्रकार.अभिजीत आंबेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.