‘माहेर’ संस्थेकडुन ऊसतोड कामगारांचा सत्कार

123
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : वढु बुद्रक येथील माहेर संस्थेच्या वतीने नाताळ सणाचे औचित्य साधुन ऊसतोड कामगारांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने त्यांना आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या. “माहेर ” संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन व अध्यक्षा हिराबेगम मुल्ला व संस्थेचे पदाधिकारी  तसेच शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, वैभव पवार, फादर संदिप जगताप, कवी आकाश बोरडे,  जिंतेद्र काळोखे, सर्पमिञ शेरखान शेख, नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य राजाराम गायकवाड व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यानी केले. “माहेर ” संस्थेने आतापर्यंत अतिशय उतम उपक्रम राबवले आहेत. उसतोड कामगारांचा केलेला सत्कार हा त्यापैकीच एक असे सरपंच गडदे यांनी भाषणात सांगितले. या मध्ये १०० हुन आधिक उसकामगार सहभागी झाले. “माहेर” संस्थेच्या या उपक्रमाने ऊसतोड कामगार भारावुन गेले.  यानिमित्त  सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला परदेशी पाहुण्याची देखील उपस्थिती होती. या निमित्ताने सर्वाना स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले. ज्यामुळे आपल्याला साखरेची चव कळते त्या ऊस कामगारांचा सत्कार करताना अतिशय आंनद होत आहे असे प्रतिपादन संस्थापिका ल्युसी कुरियन यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे आभार अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *