विद्याधाम प्रशाला शिक्रापूर प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

166
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे उपप्राचार्य श्री सुनील थोरात सर व पर्यवेक्षिका सौ.डी.डी.लकडे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील अध्यापिका सौ. रंभा विराट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकेतर कर्मचारी सौ.सुनीता राठोड यांच्या सत्यम शिवम सुंदरम या मधुर गीताने करण्यात आली. प्रशालेचे उपप्राचार्य श्री सुनील थोरात सर यांनी आपल्या मनोगत मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा आढावा घेताना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अमुलाग्र सुधारणा करण्यासाठी जातीव्यवस्था नष्ट करून समाजामध्ये स्वातंत्र्य समता व बंधुता या नीती मूल्यांची जोपासना करण्यासाठी या दांपत्याने आपले तन-मन-धन व सर्वस्व अर्पण केले आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे कार्य करून दाखवले अंधश्रद्धा व चुकीच्या रूढी परंपरा नष्ट करून विज्ञानाधिष्ठित व सत्यावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करून महिलांचे चूल आणि मूल एवढे स्थान नसून महिला ही राष्ट्रनिर्मितीसाठी खूप मोठा घटक असेल आहे हे ज्योतिबांनी ओळखले व त्या दृष्टीने पुढील कार्याची दिशा ठरवली व त्यासाठी स्वतः सावित्रीबाईंना शिक्षित करून अनेक हाल अपेष्टा सहन केल्या व स्त्रियांना शिक्षित केले आज समाजामध्ये स्त्रियांचे जे मानाचे स्थान आहे व सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत या सर्वांचे श्रेय या फुले दांपत्यांना आहे ही बाब त्यांनी आवर्जून विशद केली आणि महिला मुक्ती दिन व बालिका दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डी.एन.कुंभार यांनी केले! श्री.गणेश मांढरे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *