जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांची युवा क्रांती पोलीस मित्र महाराष्ट्र प्रदेशच्या मुख्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड 

350
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील मूळ कवठे येमाई गावचे जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांची जानेवारी २५ पर्यंत युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली आहे.शेटे यांच्या निवडीचे पत्र आज दि. ०४ जानेवारीस संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,प्रदेशाध्यक्ष रंगनाथ मोरे यांनी दिले.मागील २० वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात सामाजिकतेचे भान ठेवत कार्यरत असणारे व शेकडो गरजुंना मदतीचा हात,न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असलेले जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांच्या निवडीचे संघटनेत स्वागत करण्यात आले.राज्यातील ग्राहक,पत्रकारांचे प्रश्न,समस्या समजून घेत ते सोडविण्याचे व संघटनचे कार्य तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा.शेटे यांनी निवडीनंतर सांगितले.
  
 
      जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांची भारत सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या पोलीस मित्र महाराष्ट्र च्या महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील,खासदार डॉ.अमोल कोल्हे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.शिरूरचे आमदार अशोक पवार,माजी आमदार पोपटराव गावडे,संघटनेच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा अमृत ताई पठारे, सुमन वाळुंज,वैशाली बांगर,संगीता रोकडे,संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघमारे,डॉ.राजेंद्र हेंद्रे,अजय जोशी, पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शेलार,विभागीय अध्यक्ष सुरेश आप्पा गायकवाड,खेडचे अध्यक्ष अंकुशराव आगरकर,मलठणचे माजी सरपंच प्रकाश गायकवाड,पत्रकार प्रा.देवकीनंदन शेटे, कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच सुनीताताई पोकळे,उपसरपंच उत्तमराव जाधव रामदास सांडभोर,राजेश सांडभोर,दीपक रत्नपारखी,सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले,अविनाश पोकळे,पत्रकार साहेबराव लोखंडे,अरुणकुमार मोटे,आबासाहेब पोखरकर,मारुती पळसकर,प्रफुल्ल बोंबे,पोपटराव पाचंगे,तालुका रेशन संघटनेचे गणेश रत्नपारखी व मान्यवरांनी शेटे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत. तर शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे,जयवंतराव भाकरे,सोनभाऊ मुसळे,दत्तात्रय मुसळे,बाबाजी रासकर व कवठे येमाई ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *