बॅटरीवरच्या महिंद्रा चारचाकीला अपघात – चालक थोडक्यात बचावला –  कवठे बस स्थानक नजीकची घटना 

1745
         शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील बस स्थानक नजीक आज दि. ३१ ला सकाळी साडे सातला बॅटरीवरच्या महिंद्रा चारचाकी गाडीला अपघात झाला हा अपघात गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने व गाडीने वेग घेतल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दगडांच्या डिगाऱ्यावरून समोरच असणाऱ्या काटेरी झाडाला धडकून झाडात गुंतली. सुदैवाने या गाडीत मालक अमोल मुखेकर हे एकटेच होते.त्यांना मुकामार लागला पण ते थोडक्यात बचावले.
      याबाबत या गाडीचे मालक अमोल मुखेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चारच महिन्यांपूर्वी त्यांनी महिंद्रा कंपनीची बॅटरीवर चालणारी सुमारे अठरा लाख रुपये किमतीची एक्सयुव्ही ४०० ही गाडी खरेदी केली असून नेहमी प्रमाणे आज सकाळी ते या गाडीतून गावातील आपल्या दुकानात आले. दरम्यान कामानिमित्त बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी गाडी सुरु केली. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने गाडीने वेग घेतला अमोल यांनी ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण गाडीने प्रचंड वेग घेतल्याने गाडी दगडांच्या ढिगाऱ्यावरून थेट काटेरी झाडांना धडकून थांबली. यात या गाडीचे मोठेच नुकसान झाले असून अमोल हे या घटनेत थोडक्यात बचावले आहेत. अपघाताबाबत कंपनीला कळविण्यात आले असून पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे आश्वासन कंपनीने अमोल मुखेकर यांना दिले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *