कान्हूर मेसाई येथील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न – जि. प. शाळेच्या चौथीतील विद्यार्थी भारावले  

502
     शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हूर मेसाई येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षणाचे बाळकडू पूर्ण करणाऱ्या इयत्ता चौथीच्या मुलांचा निरोप समारंभ त्यांना सदिच्छा व शुभेच्छा देत संपन्न झाला.यावेळी चौथीतील विद्यार्थी भारावलेले दिसून आले.
       नव्याने स्थापन झाल्या शाळा व्यवस्थापन समितीने हा उपाक्रम राबविताना अतिशय सुरेख नियोजन करत सर्व शिक्षक बांधवांना आणि विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला.इयत्ता चौथीतून पाचवीत जाणाऱ्या सर्व बाल मित्रांनी शाळेबद्दल,शिक्षकांबद्दल आणि वर्ग शिक्षकांबद्दल आपल्या बाल वक्तृत्वातुन भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी चेअरमन भाऊसाहेब तळोले तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे दळवी हे होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष ननवरे, विद्यमान अध्यक्ष रामदास कुलट, उपाध्यक्ष सौ विद्याराणी ननवरे,माजी उपाध्यक्ष मोनालीताई पुंडे, संजय पुंडे,अनिल चौधरी विठ्ठलराव उकिर्डे सर, योगेश पुंडे,विजय पुंडे, मधुकर शिंदे,सौ सुनीताताई धुमाळ,अर्चनाताई मधुकर शिंदे,रामा भंडलकर,शशिकांत पुंडे,सौ रोहिणी शशिकांत पुंडे, संतोष घुले,आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते…
       वर्गशिक्षक श्री हरपुडे यांना इयत्ता चौथीच्या मुलांकडून श्रीकृष्ण मूर्ती व समई भेट देण्यात आली.वर्गशिक्षक श्री हरपुडे यांनी ही आपल्या भावना व्यक्त करताना इयत्ता चौथीतील सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केलं  तसेच उज्वल भविष्यासाठी कठोर मेहनत हाच यशाचा मंत्र असा संदेश देत मुलांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सहशिक्षिका सौ पुंडे मॅडम,शहाजीराजे दळवी अध्यक्ष रामदास कुलट यांनीही चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर उपस्थित विद्यार्थ्याना शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व संचालक मंडळाने गुलाबजाम,पुलावभात अशा स्वादिस्ट जेवणाची नेजावणी दिली. शिक्षक नरवडे यांनी सूत्रसंचालन तर सौ पल्लवी गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *