विविध स्पर्धा परीक्षेत कान्हूर मेसाई प्राथमिक शाळेचे विदयार्थी राज्य,जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले 

588
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असलेल्या शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील शाळेतून मात्र दर्जेदार,गुणवत्तावान शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत आपल्या शाळेचे,गावाचे नाव रोशन करीत आहेत. नुकत्याच झालेल्या एन एस एस ई परीक्षेत येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या कुमारी पूर्वा मधुकर शिंदे हिने राज्यात १२ वा तर कु प्रेरणा संतोष घुले हिने राज्यात १३ वा क्रमांक पटकावत उत्तुंग यश संपादित केले.या हिरकणींसोबतच मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत जि प प्राथमिक शाळा कान्हूर मेसाई चे इयत्ता दुसरीतील विद्यार्थी मनिष आनंदा पुंडे हा राज्यात ७ वा,कु. हिंदवी शंकर ननवरे राज्यात ८ वी,तर कु. रिदा रियाज मुलाणी राज्यात ९ वी आली असून या तीन विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले. भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत कु.गायत्री राहुल उकिर्डे हिने पुणे जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये कान्हूर मेसाई शाळेच्या एकूण सहा विद्यार्थ्यानी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत येत बाजी मारत आपल्या शाळेचा,शिक्षकांचा,पालकांचा आणि शाळा व्यवस्थापन समितीचा मान वाढवत आपल्या शाळेची स्पर्धा परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे,सामाजिक कार्यकर्ते शहाजीराचे दळवी,शाळेचे मुख्याध्यापक हरपुडे,शिक्षक,पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष ननवरे,विद्यमान अध्यक्ष रामभाऊ कुलट तसेच विद्यमान शाळा व्यवस्थापन समितीच्या संचालक मंडळाकडून ही अभिनंदन करण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *