ज्ञानगंगा विश्व विद्यालयात सुरु होणार गुरुकुल शिक्षण पद्धती !

635

शिरूर, पुणे (प्रा.देवकीनंदन शेटे, संपादक) : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रथमच ज्ञानप्रबोधिनी आणि ज्ञानगंगा विश्वविद्यालय यांच्यात सामंजस्य करार करून गुरुकुल शिक्षण पद्धतीची सुरुवात करण्यात आली. शिरूर सारख्या ग्रामीण भागातील मुलांना देखील शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणासोबतच संस्कार आत्मविश्वास या गोष्टी रुजविण्यासाठी ज्ञानगंगा विश्वविद्यालयाने गुरुकुल शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली.  यावेळी ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल चे विभाग प्रमुख आदित्यदादा शिंदे, ज्ञानप्रबोधिनी प्रशिक्षक प्रा.प्रशांत दिवेकर, दिल्ली शिक्षण विभाग संचालिका निरुपमा अभ्यंकर, ज्ञानप्रबोधिनी कार्यकर्ता शुभम गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, संचालिका अमृता घावटे, सी.इ.ओ. डॉ.नितीन घावटे, मुख्याध्यापक संतोष येवले, मुख्याध्यापक गौरव खुटाळ, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सुनंदा लंघे,  कॉलेज कॉर्डीनेटर व्ही.डी. शिंदे व शिक्षक उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरण व त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांसमोर येणारे आव्हाने तसेच विद्यार्थी स्वयंअध्ययन, प्रकल्प अध्ययन याविषयी प्रा.प्रशांत दिवेकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. पंचकोश शिक्षण प्रणालीवर आधारित गुरुकुल पद्धतीने शिक्षण होत असल्याचे  आदित्यदादा शिंदे यांनी सांगितले. तसेच या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये संस्कारक्षम वातावरणात विद्यार्थी घडणार असून, विद्यार्थ्यांमधील असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांचे व्यक्तिमत्व विकास आणि स्वतःच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी हि गुरुकुल शिक्षण पद्धती सुरु करत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे यांनी सांगितले. तर शिरूर तालुक्यातील पालकांचा सुद्धा या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्याध्यापक संतोष येवले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख प्रा.जयश्री खणसे यांनी केले.

 

   




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *