क्षितिज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

215

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : क्षितिज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन या वाघोली व परिसरातील डॉक्टरांच्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा वाघोली येथील सीझन्स बँक्वेट हॉल येथे पार पडली. माजी अध्यक्ष डॉ.  श्रीकांत भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पुढील 2 वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी मध्ये पुढील डॉक्टरांची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्ष- डॉ रघुनाथ रामकर, उपाध्यक्ष- डॉ देवेंद्र नहार, सचिव- डॉ अनिल गावडे, सहसचिव- डॉ राकेश कंद, कोषाध्यक्ष- डॉ विशाल पाखरे, सहकोषाध्यक्ष- डॉ संदीप घाटगे, त्याचप्रमाणे, क्रीडा, सांस्कृतिक, मेडिकोलीगल इत्यादी समित्यांसाठी विविध कार्यकारी डॉक्टरांची निवड करण्यात आली. वुमेन्सफोरम मध्ये डॉ.नीलम गावडे डॉ.रजनी नहार, डॉ.वर्षा कंद, डॉ.आरती शिंदे, डॉ.सविता खरात आदींची निवड करण्यात आली. याप्रसंगी सचिव डॉ.अनिल गावडे यांनी मागील 2 वर्षातील सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात असोसिएशन कडून केलेल्या कामाचा तपशील सादर केला. तसेच डॉ.राकेश कंद यांनी आर्थिक ताळेबंद सादर केला. डॉ श्रीकांत भुजबळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व डॉ भरत शितोळे यांनी आभारप्रदर्शन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *