समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कला,क्रीडा व कार्यानुभव शिक्षक महिला संघाचे काम अतिशय प्रमाणिक असून,नेहमीच शिक्षकांच्या हक्कासाठी ही संघटना लढत असते .या संघटनेचे ध्येय, धोरणे शिक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी रामलिंग महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक,अध्यक्षा व शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अश्विनी (राणी) कर्डिले यांच्या या क्षेत्रातील कार्याची दाखल घेत त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य कला ,क्रीडा व कार्यानुभव शिक्षक महिला संघ पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात राणी कर्डिले यांना सर्व पदाधिकारी,शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी उपस्थित सर्वांनी कर्डिले यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाच्या राज्याध्यक्षा सौ अर्चना पवार,पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोहिते पाटील,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रविंद्र उगले,व राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीबद्दल राणी कर्डिले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.



