रांजणगाव गणपती,पुणे : संस्कृतीच्या जमान्यामध्ये महिलांचे मोठे व भरीव योगदान – किरण वळसे पाटील

685
           रांजणगाव गणपती,पुणे : सध्याच्या संस्कृतीच्या जमान्यामध्ये महिलांचे मोठे व भरीव योगदान असल्याचे मत आंबेगाव तालुक्यातील अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा किरण वळसे पाटील यांनी केले. त्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी – कुंकू समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. तर एकमेकांची सुख – दुखे वाटून घेणारा मकर संक्रात सण सौभाग्य व संस्कृती यांचा सुरेख संगम असल्याचे मत किरण वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
           या कार्यक्रमाला आंबेगाव – शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील,शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे,आंबेगावच्या सभापती उषा कानडे,जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर,सविता बगाटे,सुनिता गावडे,अरुणा थोरात,रुपाली जगदाळे,खरेदी – विक्री संघाचे संचालक दत्तात्रेय कदम,जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले,जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशर पवार,राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पाचुंदकर,संतोष भरणे,गणेश लांडे,अनिल दूंडे,अरुण गोरडे आदि उपस्थित होते.
           किरण वळसे पाटील म्हणाल्या कि,महिला बचत गट व हळदी कुंकू समारंभ हे महिलांच्या उन्नतीसाठी आणि सन्मानासाठी गरजेचे आहेत. महिलांवर संपूर्ण कुटुंबाचा भार पेलण्याची खूप मोठी जबाबदारी असल्याने त्यांनी स्वतः मानसिक व शारीरिकदृष्टया सक्षम असायला हवे.समाजतील वंचित घटकांकरिता समाजकारणाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.यावेळी महिलांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी केले. सूत्रसंचालन रुपाली धुमाळ यांनी केले.तर पूनम टेमगिरे यांनी आभार मानले.
– प्रतिनिधी,पोपट पाचंगे,(सा.समाजशील,रांजणगाव गणपती,पुणे)   



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *