कुपन घोटाळा प्रकरण ; आरोपीस जामीन मंजूर

377

शिरूर : कुपन घोटाळा केल्या प्रकरणी आरोपी दत्ता लीलाबाई काकडे यास पुणे कोर्टात दि. १३ मार्च रोजी जामीन मंजूर झाला असल्याचे वकील किरण रासकर यांनी सांगितले. रांजणगाव येथील फियाट कंपनी ला जेवण पुरवणाऱ्या कानाक्का फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ४४६५ जेवणाचे व ४१९ नाष्ट्याचे असे एकूण ४८८४ बनावट कुपन तयार करून सुमारे तीन लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी आरोपीस १३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *