शिक्रापूर,शिरूर : गोरगरीब,वंचित मुलांसाठी सह्याद्री युवा मंच,शिक्रापुर यांचा आधार

572

            शिक्रापूर,शिरूर : शिक्रापूर येथील सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कानडे यांनी स्वतःचा वाढदिवस संभाजी भुजबळ वसतीगृहात अनाथ आदिवासी गरजु मुलांना वस्तु,कपडे,शुज,चप्पल व अन्नदान करुन आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला.  आपण समाजामध्ये रहात असताना ज्या वेळेस समाज आपल्याला डोक्यावर घेतो.त्यावेळेस आपण उंचीवर असतानाही मिनीवरच राहायला हवे याच जाणिवेतुन शिक्रापुर येथील शशिका़त कानडे यांनी त्यांचा ३१ वा वाढदिवस अनाथ आदिवासी मुलांच्या वसतीग्रहात जाऊन त्यांच्या सोबत साजरा केला.

            समाजातील वंचित मुलांसाठी ‘सह्याद्री युवा मंच’ ने आयोजीत केलेला हा उपक्रम खरोखरच प्रशासनीय आहे.या उपक्रमामुळै वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उमलला.त्यामुळे हा उपक्रम ह्रदयस्पर्शी झाला. कार्यक्रमाचे नियोजन ,रुपरेषा सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम काका शिंदे,सचिन शिंदे संघटक -प्रसारक आणि प्रवक्ते अमोल झणझणे सह्याद्री युवा मंच यांनी या उपक्रमाचे सुत्रसंचालन करुन याबद्दलची जागरुकता,महत्व सांगितले.यावेळी उपस्थित असलेले मान्यवर माजी आदर्श सरपंच रामदास सासवडे ,नवनाथ सासवडे,अशोक पाटील,रमेश चव्हाण,सुधिर कदम,वैभव चौगुले,सतिश पाटील संग्राम पाटील,किरण रुके,प्रा.संभाजी भिसे,अमोल साळवी,प्रविण बागल आणि सर्व सह्याद्री युवा मंच,शिक्रापुर पदाधिकारी,सभासद व मित्र परिवार उपस्थित होता.

-प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *