मुरबाड,ठाणे : तालुक्यात राजकिय गतीविधीना वेग तर वंचित आघाडीची जोरदार चर्चा तर स्थानिक कार्यकर्त्याचे मनोमिलनाचे नेत्यांना आव्हान

1028
       मुरबाड,ठाणे : युती आणि आघाडी यांच्यातील कार्यकर्त्याच्या स्थानिक पातळीवरिल मतभेदामुळे युती व आघाडीच्या वरिष्ठाना त्याच्या मनोमिलनाचे आव्हान असताना वंचित अघाडीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. यामुळे राजकिय गतीविधीना मुरबाड मध्ये वेग आल्याचे दिसुन येत आहे.
        मुरबाड मध्ये राष्ट्रवादीचा बोलबोला असताना कॉग्रेस बोटावर मोजण्याएवढी राहीली होती. मात्र मागिल काही वर्षात कॉग्रेसने बऱ्याने तालुक्यात उभारी घेतली.  तीच परिस्थिति सेना – भाजपा  व आर पी आय मध्ये झाल्याने शिवसेना व भाजपा कार्यकर्ते एकमेका समोर विरोधक म्हणुनच कार्यरत होते. भाजपाच्या सत्तेत शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला.  मात्र शिवसेनेचा एक गट कायम पणे विरोधात राहील्याने कोंडी वाढत गेली. आता या कार्यकर्त्याना आता मनोमिलनाचे धडे देण्याची वेळ वरिष्ठ नेत्यावर आल्याने कुठल्याही उमेदवाराला ऩिवडणुकीत कडवे आव्हान उभे करावे लागणार आहे. आघाडीला मनसे ने पांठिबा दिला तर आर पी आय  युती त रहाते किंवा नाही हा प्रश्न कार्यकर्त्याना पडला आहे. मात्र या सर्व बाबी असताना वंचित आघाडीचा बोलबाला असल्याचे दिसुन येत असल्याने कार्यकर्त्याचे मनोमिलन कसे होते या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.उमेदवार कुणीही असो राजकिय समिकरणात जातीचा पगडा चालणार हे निच्छीत असे असताना कार्यकर्त्याच्या भुमिकेवर ऊमेदवाराची भस्त असताना मनोमिलन कसे होते ? याची जोरदार चर्चा मुरबाडमध्ये सर्वत्र सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *