न्हावरे,शिरुर : कोहकडेवाडीत कृषी पंप चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा शोक बसून दुर्दैवी मृत्यू

866
           न्हावरे,शिरुर : शिरूर तालुक्यातील न्हावरे जवळील कोहकडेवाडीत कृषी पंप चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि. १५ ला सायंकाळच्या सुमारास घडली आहे.राहुल ऊर्फ काकासाहेब कानीफनाथ कोकडे (वय-23 वर्ष) रा – कोकडेवाडी,पो – न्हावरे, ता – शिरुर, जि – पुणे. असे या घटनेत जागीच दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  शेतात कृषी पंप चालू करण्यासाठी गेलेल्या व कृषी पंपाच्या स्टार्टर बॉक्सला अचानक विद्युत प्रवाह आल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
       मृत युवकाचे वडील कानिफनाथ सोनबा कोकडे यांनी वरील घटनेची फिर्याद न्हावरे पोलिसांमध्ये दिली आहे. पुढील तपास न्हावरे पोलीस करत आहेत.
– प्रतिनिधी,योगेश मारणे,(सा.समाजशील,न्हावरे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *