टाकळी हाजी,शिरूर : माळवाडी (टाकळी हाजी )येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला टाकळी हाजी ग्रामपंचायतकडून वाँटर फिल्टर,विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान

692
         टाकळी हाजी,शिरूर : तालुक्यातील टाकळी हाजींच्या माळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत टाकळी हाजी  ग्रामपंचायतकडून वाँटर फिल्टर,(जल शुध्दीकरण यंञ) नुकतेच बसविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही आता स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
         माळवाडी येथील टाकळी हाजी ग्रुप ग्रामपंचायत सदस्या अंजना प्रकाश भाकरे ग्रामपंचायत  सदस्य सोमनाथ रसिक भाकरे यांच्या प्रयत्नातून शाळेला जल शुध्दीकरण यंञ बसविण्यात आले आहे. दररोज आर वो.चे शुध्द केलेले पाणी मिळणार असल्याने आता विद्यार्थ्यांचे आरोग्य ही निरोगी राहणार आहे.यावेळी मुख्याध्यापक शिवाजी वरखडे म्हणाले की या आर. वो. फिल्टर मुळे (जल शुध्दीकरण यंञामुळे ) शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळण्याची अनेक दिवसांची अडचण लक्षात घेत येथिल दोन्ही ग्रा.पं. सदस्यांनी याकामी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केल्याने आता शाळेतील सर्वांनाच स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी वरखडे ,शिक्षक – विनायक पडवळ ,अरुण खोमणे,पांडुरंग निचित , ,शिक्षिका – सविता बनकर ,सुमन पठारे आदि उपस्थित होते. टाकळी हाजीचे सरपंच दामुअण्णा घोडे व त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सहकाऱयांनी माळवाडी शाळेला भेट दिलेल्या या आर. वो मशीनमुळे   पालकवर्गातून आनंद व्यक्त होत आहे.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेशराव भाकरे यांनी दोन्ही सदस्यांचे आभार मानले.
– विशेष प्रतिनिधी,सतीश भाकरे,(सा.समाजशील,टाकळी हाजी,शिरूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *