शिरूर,पुणे : तालुक्यातील रामलिंग येथे फोफावले अवैध दारू धंदे तातडीने बंद करा, महिलांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱयांना निवेदन

666
           शिरूर,पुणे : तालुक्यातील रामलिंग येथे फोफावले अवैध दारू धंदे तातडीने बंद करावेत अशी मागणी रामलिंग महिला उन्नती संस्था,आदिशक्ती महिला मंडळ व महिलांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांना नुकतेच निवेदन देत केली आहे. यावेळी रामलिंग महिला उन्नती संस्था अध्यक्षा, राणी कर्डीले,आदिशक्ती महिला मंडळ अध्यक्षा, शशिकला काळे,मनीषा कालेवार,दक्षता कमिटीच्या शोभना पाचंगे,ज्योती हांडे,अलका ढाकणे,वर्षा नारखेडे व इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला उपस्थित होत्या.
राणी कर्डिले – अध्यक्षा रामलिंग महिला उन्नती संस्था
     रामलिंग व परिसरात सुरु असलेल्या अवैध हातभट्टी दारू बंद होण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांना रामलिंग महिला संस्थेचा वतीने हे निवेदन देण्यात आले.रामलिंग येथे वीटभट्टी कामगार महिला जास्त आहेत,तेथे जवळच हातभट्टी दारू विकली जाते,या नगर,कष्टकरी,गोरगरीब महिलांचे नवरे दरोरोज त्यांना पिऊन त्रास देतात, हे कुठे तरी थांबले पाहिजे,यामुळे अनेक महिलांचा होणारा शारीरिक,मानसिक छळ थांबेल.दारूच्या व्यसनाधीन झालेल्या अनेक कामगारांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत.पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ही अवैध दारू विक्री बंद करन्यायाची मागणी महिलांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 
    डॉ.सचिन बारी – उपविभागीय पोलीस अधिकारी,दौंड,उपविभाग 
 शिरूर तालुक्यातील कारेगाव,कवठे येमाई,रामलिंग परिसरातुन अवैध धंदे सुरु असल्याबाबत आलेल्या तक्रारीनुसार पोलीस तातडीने कारवाई करून या परिसरात चालणारे ताडी,मटका,दारू,जुगार सारखे अवैध धंदे नेस्तनाबूत करीत आहेत. अवैध दारू व एवढं धंदे यांचा पूर्णपणे बिमोड करण्याच्या हेतूने पोलीसांची कडक कारवाई सुरु आहे. आपाल्या परिसरात अवैध धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. या बाबत पोलिसांना माहिती देण्याची संपूर्ण ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. 
– प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *