कवठे येमाई,शिरूर : मलठण पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरु करा – डॉ.सुभाष पोकळे व नागरिकांची मागणी

516
          कवठे येमाई,शिरूर : शिरूरच्या पश्चिम भागासाठी मुख्य पोस्ट कार्यालय असलेल्या मलठण येथील पोस्टात आधार कार्ड सुवीधा उपलब्ध करावी अशी मागणी शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे व परिससरातील ग्रामस्थांनी केली आहे. 
           शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मलठण,सविंदणे,मिडगुलवाडी ,कान्हूर मेसाई,चिंचोली मोराची,कवठे येमाई,आमदाबाद,टाकळी हाजी,वडनेर खुर्द,फाकटे,चांडोह,पिंपरखेड व इतर अनेक वाड्या वस्त्या असून अनेक शाळा,महाविद्यालये आहेत. आधार कार्ड हे सर्वच कामात अत्यंत गरजेचे ठरत असून अनेकांना अद्याप आधार कार्ड काढता आलेले नाहीत.अनेक शालेय विद्यार्थी,महिला,नागरिकांनी काढलेल्या आधार कार्डात अनेक चुका झाल्या असलेल्या पाहावयास मिळत आहेत.त्या दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना सुमारे ३० कि.मी. अंतरावर असलेल्या शिरूर,रांजणगाव गणपती येथे जावे लागत आहे.तेथेही दिवसभर थांबून नंबर लागून आधार दुरुस्ती होईल याची शास्वती नसते. त्या करिता पुणे पोस्ट विभागाने मलठण पोस्ट कार्यालयात तातडीने आधार केंद्र सुविधा केंद्र सुरु करावे अशी मागणी डॉ.पोकळे व नागरिकांनी केली आहे. 
– सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *