मुरबाड,ठाणे : पंधरा दिवसापुर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, कपडे, बुट व मोबाईल वरुन पटली ओळख

2163
       मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील काकडपाडा येथिल कल्पेश चौधरी (22) हा तरुण गेल्या पंधरादिवसा पासुन बेपत्ता होता.  त्याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र  पंधरा दिवसा पासुन त्याचा कुठेही तपास न लागल्याने सर्वत्र शोधाशोध सुरु होती.
 आज सकाळी  मुरबाड- म्हसा रोडवरिल किंडमा कंपनी  समोरील परिसरात दुर्गधी सुटल्याने त्याचा शोध घेतला असता  एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्याचे कपडे,बुट  व मोबाइल वरुन हा कल्पेश चौधरी याचाच मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. सदर तरुण जि.प. शाळा शिरवली जवळील एका फार्म हाउस मध्ये कामाला असल्याचे सांगण्यात आले.
     मुरबाड पोलिसाना याची माहीती मिळताच घटना स्थळी रवाना झाले.  मृतदेह सडलेल्या अवस्थेत  असल्याने त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. गावाबाहेरच हा मृतदेह सापडल्याने यावर शंकेचे सावट व चर्चा सुरु झाली आहे. मात्र नेमके कारण अजुन समोर आले नसल्याने याबाबत सर्वत्र  चर्चा सुरु आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *