नीरा नरसिहपूर,इंदापूर : बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर,आचारसंहिता लागू

609
        नीरा नरसिंहपूर,इंदापूर : (बाळासाहेब सुतार) : इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
        श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. निवडणूक नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी सोमवार ३ जून ते शनिवार ८ जून असा कालावधी आहे. छाननी १० जून रोजी होणार असून १५ जून रोजी उमेदवारी अर्ज माघार घेणे व निवडणुक रिंगणातील उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान २३ जून रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच असे होईल. तर मतमोजणी २४ जून रोजी होणार आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या श्रीमती रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील यांचे दोन महिन्यापूर्वी निधन झालेमुळे ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 – प्रतिनिधी,(सा.समाजशील,नीरा नरसिहपूर,इंदापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *