पुणे : लुल्लानगर पुणे येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या अमृतमहोत्सवा निमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न, ८०० हुन अधिक विद्यार्थिनींचा सहभाग

652
          पुणे : लुल्लानगर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलला पुण्यात ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामूळे फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने शाळेच्या आजी-माजी विद्यार्थिनिंसाठी मिनी मॅरेथॉनचे स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. १,२ आणि ३ किलोमीटर अशा अंतरात या स्पर्धा झाल्या. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजिली होती. या स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज आणि माजी विद्यार्थिनी अशा सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. 
            विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १ ते १० सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धचे आयोजन मुख्याध्यापिका सिस्टर मरिसा ए.सी., जितेंद्र नायर, सबा सय्यद यांनी केले. क्रीडा शिक्षक संदिप घोलप यांनी नियोजन करून सर्व स्वयंसेवक व शिक्षिकांनी नियोजनात व स्पर्धा पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा कामा, शितल डिसुजा, दिप्ती आढाव यांनी केले. आभार दिप्ती नेत्रम यांनी केले.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *