मिडगुलवाडी,शिरूर : मिडगुलवाडीच्या उपसरपंचपदी मंदा मिडगुले यांची बिनविरोध निवड

498
         मिडगुलवाडी,शिरूर : तालुक्यातील मिडगुलवाडीच्या उपसरपंच पदी मंदा विष्णू मिडगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वांना संधी या हेतूने मंदा मिडगुले यांना उपसरपंच पदी काम करण्याची संधी दिल्याचे माजी सरपंच सुनील मिडगुले यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.
       सरपंच हरिभाऊ आण्णा मिडगुले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामसेवक बारहाते,माजी सरपंच गणेश मिडगुले,प्रभावती मिडगुले,कैलास मिडगुले व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल मिडगुले व अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी मंदा मिडगुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडी नंतर ग्रामस्थानी गुलाल उधळून फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांच्या निवडीचे स्वागत केले. निवडी नंतर मंदा मिडगुले यांनी सर्वांचे आभार मानत गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *