कवठे येमाई,शिरूर : जांबुत गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील

1332
        कवठे येमाई,शिरूर : तालुक्यातील जांबुत गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. ते आज जांबुत येथे जय मल्हार हायस्कुलसाठी खासदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या वर्गखोल्यांचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. माजी खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी सकाळी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
         विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेचा निकाल, शालेय परीसराच्या भौतिक गरजा, ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतुन उभारण्यात आलेल्या शाळेच्या नुतन इमारतीच्या कामकाजाबाबत आढावा घेत विद्यार्थ्यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या व जांबुत गावच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे ह्यावेळी त्यांनी सांगितले.
          यावेळी  शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी शाळेच्या इमारत बांधकामासाठी १ लाख रुपये देणगी आढळराव पाटील यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केली. युवासेना शिरूर तालुका युवा अधिकारी माऊली घोडे यांनी विद्यालयास शुद्ध पाण्याचा आर.ओ.फिल्टर देण्याचे जाहीर  केले.
            यावेळी शिवसेना आंबेगाव-शिरूर तालुकाप्रमुख व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना शिरूर तालुकाप्रमुख गणेश जामदार, युवासेना राज्य विस्तारक सचिन बांगर, जांबुतच्या सरपंच डॉ.जयश्री जगताप, माजी पंचायत समिती सदस्य वसुदेव जोरी, माजी सरपंच बाबाशेठ फिरोदिया, उपसरपंच पंढरीनाथ गाजरे, शिवसेना शाखाप्रमुख अरुण कदम, प्रशालेचे मुख्याध्यापक मा.आर.एस कापसे  यांच्यासह गावातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *