कवठे येमाई,शिरूर : चांडोह ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार, माजी सरपंच केशव कोंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे कारवाईची मागणी

2016
         कवठे येमाई,शिरूर : शिरूर तालुक्यातील चांडोह ग्रामपंचायतीमध्ये गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक व इतर सदस्य यांनी संगनमताने लाखो रुपयांचा मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी चांडोहचे माजी सरपंच केशव दत्तू कोंडे यांनी निवेदनाद्वारे पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिरूर गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देत केली आहे.
          चांडोह गावातील अनेक कामे झालेली नसताना या कामांचे चेकद्वारे पेमेंट झाल्याचे कोंडे यांनी सांगितले. यातील शौर्य फाउंडेशन यांना काम न करताच दिलेले चेक, नळ पाणीपुरवठा, स्मशानभूमी  यांची बोगस बिले काढलेली असल्याचे त्यांनी सांगितले. चांडोह येथीलच सरोदे वस्ती पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली नसून त्याचे ही बिल काढण्यात आलेले आहे. या कामांसाठी आवश्यक असलेली वर्क ऑर्डर संबंधित कंत्राटदार यांना मिळालीच नाही त्यामुळे वरील कामे झालेली नसतानाही सरपंच व ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करून सदर कामांची बिले अदा केली असल्याचे उघड झाल्याचे कोंडे यांनी सांगितले.
     केशव कोंडे – माजी सरपंच,चांडोह  
  ऐन दुष्काळातील कडकी उन्हाळ्यात गावच्या सरकारी विहिरीतील पिण्याचे पाणी गावातील गणेश संपत पानमंद आणि दादाभाऊ कचर पानमंद या इसमांनी चोरी करून शेतीसाठी वापरल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले नाही त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. भिषण दुष्काळ असताना चांडोह येथील सरकारी विहीरीचे पाणी शेतीसाठी चोरी करून वापरले असल्याने नागरीकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही.याबाबत ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता या विहिरीतून पाणी चोरी होत असल्याचे त्यांच्या ही निदर्शनास आले आहे. याबाबत शिरूर तहसीलदारांकडे लेखी तक्रार करूनही अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.
संदीप कोहिनकर – उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे 
   सदर प्रकरणाचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला असून योग्य त्या कार्यवाहीसाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. या विषया संदर्भातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
 या बाबत अधिक माहिती साठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *