टाकळी हाजी,शिरूर : टाकळी हाजी – कवठे येमाई जिल्हा परीषद गटामधे जिल्हा परीषदेच्या माध्यमामधुन सहा अंगणवाडी इमारतीना मंजुरी- जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांची माहिती

736
 टाकळी हाजी,शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी- कवठे येमाई जिल्हा परीषद गटामधे जिल्हा परीषदेच्या माध्यमामधुन सहा अंगणवाडी  इमारतीना मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी दिली. गावडे म्हणाल्या की, माझ्या गटामधे अनेक ठिकाणी  अंगणवाडीच्या स्वतंत्र इमारती नसल्या मुळे मुलांची खूपच गैरसोय होत होती. याबाबत त्या त्या गावच्या ग्रामस्थांनी याबाबत अनेक वेळा मागणी केली होती. त्यासाठी जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अंगणवाडी इमारत बांधकामास निधी मंजुर करण्यात आला आहे. प्रत्येक खोलीला सात लाख रुपये या प्रमाणे ४२ लाख रुपये मंजुर झाले आहेत.
 संगमवाडी ( म्हसे ),माळ वस्ती ( मलठण ), येडे बोऱ्हाडेवस्ती, काळुबाई नगर ( कवठे येमाई ), चांडोह गावठाण, संविदणे  डोंगरभाग या सहा वर्ग खोल्यांना मंजुरी मिळाली आहे. मिडगुलवाडी ता शिरूर येथील रस्त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमामधुन चार कामासाठी वीस लाख रुपये निधी मंजुर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांनी दिली. अंगणवाडी इमारती नव्याने बांधण्यात येणार असल्याने ग्रामस्थांची मागणी पुर्ण होणार असुन या व्यतिरिक्त ऐकाच वेळी चार अंतर्गत रस्ते पुर्ण होणार असल्याची माहीती ही त्यांनी दिली.
– संजय बारहाते,प्रतिनिधी,(सा.समाजशील,टाकळी हाजी)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *