दोंडाईचा शहरात भरदिवसा पथदिवे सुरू; नगरपालिकेचे दुर्लक्ष

838
दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) :  गेल्या काही दिवसापासून स्टेशन भागात भाजी मार्केट बाहेरील पथदिवे भर दिवस सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. नगरपालिकेला रहिवाश्यांकडून वारंवार कळवून देखील ते पुन्हा काही दिवसांनी ते दिवसा चालू असल्याचे दिसत आहे. रात्रभर चालू असलेले पथदिवे बंद करण्याचे विसरतात की निष्काळजी पणा सुरू आहे ? असे प्रश्न नागरिकांमधून केले जात आहे. रात्रभर रस्त्यावर प्रकाश देतात त्याबरोबर संपूर्ण दिवस ही सूर्याचा लख उजेडातही नगरपालिका व वीज कंपनी देऊ लागले आहे, की ही नवीन यो जना आहे, असा सवाल केला जात आहे. भरदिवसा पथदिवे चालू राहिल्याने नगरपालिकेला भरमसाठ बिल येऊन नुकसान सोसावे लागणार आहे. हा खर्च शेवटी कर रूपाने रहिवाशांना कडून वसूल केला जाणार आहे. एवढी विजेची उधळपट्टी चालले आहे. एखाद वेळी चुकून पथदिवे सुरू राहून जातात हे आपण समजू शकतो पण वारंवार भरदिवसा पथदिवे सुरू असल्याचे प्रकार पाहावयास मिळत आहे. विजेचे दर कमी झाले आहेत की वेळेपूर्वी दिवाळी साजरी केली जात आहे, असा टोमणा देखील मारला जात आहे. भर दिवसा पथदिवे सुरू झाल्याचा प्रकार पाहून नगरपालिका निवडणुकीच्या दिवाळी साजरी होत असल्याचे बोलले जात आहे. दिवसभर चालू  असलेले पथदिवे याकडे गंभीरपणे लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *