महादेवपुराच्या मुख्य रस्त्याचे तीन तेरा…..

766

दोंडाईचा, धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : शहरातील मध्यभागी असलेला महादेवपुरा परिसरातील रस्त्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. हे सर्वात मोठी दाट लोकवस्ती असलेले शहर आहे. सध्या गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस परिसरात सुरु आहे. त्यामुळे महादेवपुराच्या मुख्य रस्त्यावर चिकट मातीमुळे चिखल झाले आहे. तेथे रस्ता आहे की नाही असा प्रश्न बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पडत आहे.रस्त्यात झालेल्या मोठं-मोठ्या खड्यांमुळे रस्तायचे तीन तेरा झालेले पाहवायस मिळत आहे. या रस्त्यावर पादचाऱ्याला देखील व्यवस्थित चालता येत नाही. तर दुचाकी व चारचाकी कशी जात असेल याचा विचार न केलेला बरा. तेथील नागरिक रस्त्यावर जातांना तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आहे. या सर्व गोष्टींकडे नगरपालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या रस्त्याला मलमपट्टी करावी एवढी माफक अपेक्षा नागरिकांमधून केली जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *