टाकळी हाजी ,शिरूर : आमदाबाद येथील जळीतग्रस्त कुटुंबाला शासनाकडून १२ लाख रुपयांची मदत

687

           टाकळी हाजी ,शिरूर : (प्रतिनिधी,संजय बारहाते) : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे झोपडीला आग लागुन तीन जणांचा होरपळून जागीच  मृत्यु झाला होता.त्या कुटुंबियांना शासनाकडुन बारा लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.या कुटुंबाला एकूण १२ लाख रुपयांचे धनादेश मंडल अधिकारी एकनाथ ढाके सरपंच योगेश थोरात, तलाठी आर.सी. सरोदे, ग्रामसेवक निळकंठ गायकवाड, एकनाथ माशेरे, पोपट घुले, सतिष थोरात, प्रविण थोरात,यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते उषा लालु गावडे व अरुण फक्कड पवार यांना देण्यात आले.
आमदाबाद येथे २९ एप्रिल रोजी घराला आग लागुन लालासाहेब गावडे यांच्यासह कुंटुबामधील दोन लहान मुलांचा जागीच जळुन मृत्यु झाल्याची  दुःखद घटना घडली होती. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तत्काळ भेट देत व स्वतः अर्थिक मदत करीत, या कुटुबाला शासकिय मदत मिळुन देण्याची ग्वाही दिली होती. उपविभागीय अधिकारी भाऊ गलंडे, तहशिलदार गुरु बिराजदार यांनी तत्काळ शासनाला प्रस्ताव पाठवून बारा लाख रुपयांची मदत मिळुन दिली.  या पुर्वी या कुटुबाला पराग व भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यांनी देखिल प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली होती.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *