करवीर,कोल्हापूर : शिये गावच्या पुरग्रस्थांच्या मदतीला गावकरी व तरुण सरसावले

692
        करवीर,कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला वरदान असलेल्या पंचगंगा नदीने या वर्षी रुद्र अवतार धारण केल्याने गेल्या सहा- सात दिवसांपासून महापुराने थैमान घातले असून करवीर तालुक्यातील शिये येथील गाव परिसरातील सातशेच्यावर कुंटुंबे व जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर आता  त्यांच्या मदतीसाठी गावकरी व परिसरातील नागरिकांचे हजारो हात पुढे सरसावले आहेत.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिये गावाभागाला त्याचा फटका बसला.संपुर्ण गावभागातील नागरीकांना ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. यावेळी या कुटुंबातील लोकांना बाहेर काढण्यासाठी गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सहकार्य केले.हि सर्व स्थलांतरित कुटुंबे व जनावरे शियेतीलच माळवाडी, विठ्ठलनगर,श्रीरामनगर, हनुमाननगर या भागात स्थलांतरित झालीत.गेले सहा – सात दिवसांपासून या कुटुंबियांना ग्रामपंचायत, तरूण मंडळे, ग्रामस्थ व परिसरातील टोप, नागाव, कासारवाडी,जठारवाडी येथील तरुण मंडळे, व विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जेवण, पाणी आदी वस्तूंचे व जनावरांना चारा व पशूखाद्य वाटप करण्यात येत आहे.तर शिये उपकेंद्र व गावातील खाजगी डाॅक्टर्स व सामाजिक संस्थांकडून वैद्यकीय सेवा सुरू आहेत.
पंचगंगेच्या महापुराच्या वेढ्यानंतर ग्रामस्थ सुरक्षित स्थळी 

शिये गावभागाला महापुरांच्या पाण्याने वेढा घातल्यानंतर सर्व लोकांना सुरक्षित स्थळी बाहेर हालण्यात आले.या वेळी गावातील नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडविले. गावातील विजपुरवठा खंडीत झाला आहे.मात्र चोरट्यांचा सुळसुळाट सुरु झाल्याने  गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील सुमारे पंचवीस ते तीस तरुणांना दिवस- रात्र पहारा ठेवण्याची वेळ आली आहे. तर जसजसा पुर ओसरत जाईल तसतसे गावातील गल्लीतील व हनुमान मंदिर परिसरातील स्वच्छता  स्थानिक तरुणांनी सुरु केली आहे.

– (प्रतिनिधी,सतीश पाटील)करवीर,कोल्हापूर
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *