शिरूर,पुणे : रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिन साजरा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग,पांडुरंग अण्णा थोरात विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात संपन्न  

642
         शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज दि. ५ ला शिक्षक दिन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग,पांडुरंग अण्णा थोरात विद्यालयात मोठ्या उतसाहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
          यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक नामदेव तात्या जाधव,मा.सरपंच रामदास जामदार,ग्रामपंचायत सदस्य यशवंत कर्डिले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माऊली रेपाळे ,संस्थेच्या अध्यक्षा राणीताई  कर्डिले यांनी शाळेतील शिक्षकांना आंबा, जांभुळ यांची रोपे,सन्मान पत्र देत शाळेच्या मुख्याध्यापीका रंजना वाखरे ,सुनंदा हिंगे ,जयश्री मांजरे ,उज्वला लाळगे,मनीषा सालकर ,नीता वाबळे ,नंदिनी शिर्के,रुपाली बोर्डे, रोहिदास पोटे,सुभाष पोटघन ,गणेश रासकर या सर्व शिक्षकांना सन्मानित केले.
           यावेळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी ,पांडुरंग अण्णा थोरात शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक ,शिक्षक बनले होते ,यात 10 विचा विद्यार्थी  दिनेश करे,7 वी ची विद्यार्थिनी पायल बांडे यांच्यावर दोन्ही शाळेने मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांना ही  वृक्षाचे रोप आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .यावेळी शाळेतील उपस्थित विद्यार्थ्याना खूपच आनंद झाला. यावेळी  शिक्षक व विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले,शिक्षक झाल्यावर खरच खूप छान वाटले,आम्हला खूप आदर मिळाला,लहान मुलांना शिकवायला मिळाले,अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डिले यांनी सध्या निसर्गाचा होत असलेला विनाश याला आपण कसे जबाबदार आहोत,त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन झाडे लावली व जगवली पाहिजेत ज्यामुळे पाऊस पडायला मदत होईल. म्हणूनच आज ही झाडे शिक्षकांना शिक्षकदिनी भेट दिल्याचे कर्डिले यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.
             आज आपण इथे शिकतो चांगले संस्कार आपल्यावर होतात. हे सर्व सहज शक्य होते ते येथील शिक्षकांमुळे.  आई नंतर तेच आपले गुरू आहेत. विद्यार्थी मित्रांनो म्हणून जीवनात कितीही मोठे झाले तरी शिक्षकांना कधी अपमानित करू नका,त्यांच्याशी नेहमी आदराने वागा,त्यांचे योगदान खूप मोठे आहे,ते आपण आयुष्य भर फेडू शकणार नाही .म्हणून आज शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला.सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाचा हार्दिक शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *